Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

हळदी कुंकू कार्यक्रमातुन महिलांना दिला आरोग्याचा संदेश..


डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम :हळदी कुंकू कार्यक्रमातुन महिलांना दिला आरोग्याचा संदेश

अहमदनगर :

दिनांक 31 जानेवारी रोजी  मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  व  माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता  हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला.

- Advertisement -

प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. सोनुबाई विजय शेवाळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली वाहडणे (स्त्री. रोगतज्ञ) वाहाडणे  हॉस्पिटल, अहमदनगर ह्या होत्या तसेच सौ कविता बबन वाकळे (तलाठी), सौ. निता शिवराम गीरी (साहाय्यक कृषि अधिकारी) डॉ.सुवर्णा कांबळे (सामाजिक आरोग्य अधिकारी) व डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्या,  परिचर्या महाविद्यलयाच्या व डॉ. योगिता औताडे उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  प्रमुख उपस्थतीत होत्या.

या निम्मीताने महिल्यासाठी डॉ. सोनाली वाहडणे स्त्री रोग तज्ञ यांनी महिलांमध्ये योनि मुख मार्गाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून व चर्चा केली. या प्रसंगी त्या म्हणाल्या कि महिलांनी  आपलया ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींचे योनी मार्गाच्या कर्करोग होऊ नये यासाठी  लसीकरण करणे आवश्यक आहे तसेच, समतोल आहार रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक महिन्यात मासिक पाळी  नंतर स्व-स्तन परीक्षण करून जर त्यात काही बदल जाणवले तर  त्वरित  डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, वयाच्या ४५ वर्षानंतर स्तनांची सोनोग्राफी (म्यॅमोग्राफी) करणे आवश्यक आहे. म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात जागरूक असावे. लवकर निदान  व योग्य उपचारातून कर्करोग बारा होऊ  शकतो व आपले आयुष्य सुखकर होऊ शकते.

तसेच परिचर्या महाविद्यालयातील स्त्री रोग विभाग  प्रमुख सौ. कविता भोकनळ व सहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी स्व-स्तन परिक्षण कसे करावे या विषायी प्रात्यक्षिक  दाखवले .या निम्मीताने महिलाना सामाजिक आरोग्य विभागाने पॅम्फ्लेट देण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी स्वयंस्फूर्तिने सहभाग नोंदविला तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाला उत्सुफुर्त प्रतिसाद दिला.
डॉक्टर वहाडणे यांनी आरोग्य शिक्षणाचा देऊन, जनजागृती केली, आणि अमूल्य असा आरोग्याचा वाण आपल्या सर्वाना दिला असे प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर  म्हणालया. यावेळी त्यांनी सर्वांचे उपस्थिती बद्दल आभार व्यक्त केले.

- Advertisement -

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य परिचर्या विभाग प्रमुख डॉ. योगिता औताडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांना सौ. सलोमी तेलधुणे ,बाल आरोग्य विभाग व महिला सेल प्रमुख, सौ. कविता भोकनळ ,स्त्री रोग विभाग प्रमुख तसेच सहहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी सहकार्य केले तसेच पुजा मोरे व सौ. आश्लेषा सुरासे यांनी सूत्र संचालन केले श्री. अमोल शेळके ,सौ रिबिका साळवे ,सौ सोनल बोरडे सौ. ऐश्वर्या पवार आणि श्री. प्रशांत अंबरीत ,यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व प्रथम वर्ष एम एस्सी नर्सिंग व जीएनएम च्या विद्याथ्यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा