राज्यातील आठ खासदार संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळा सारखे काम करेल
#पक्षाच्या रौप्यमहोत्सवी स्थापनादिनाच्या निमित्ताने मेळाव्यात शरद पवारांची गर्जना
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेसाठी मिशन ८५!!
नगरच्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यात निर्धार..
राज्यभरातून पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती..
निवडून आलेल्या आठ खासदारांचा मेळाव्यात सत्कार..
नगर:
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना जनमत होते का? जनतेची सहमती होती का असा प्रश्न उपस्थित करत मोदींच्या पाठीमागे आता बहुमत राहिलेले नाही. स्थापन झालेले एनडीए सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्याने उभे राहिले नाही. आता ना मोदी सरकार राहिले आहे ना मोदी गॅरंटी राहिली आहे, असा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा रोप्य महोत्सवानिमित्ताने नगर मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. नरेंद्र मोदींनी मला भटकती आत्मा संबोधले. त्यांचे म्हणणे बरोबर आहे, आत्मा कधीच मरत नसतो त्यामुळे शरद पवार नावाची भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशारायावेळी पवार यांनी दिला. राज्यामध्ये आम्ही दहा उमेदवार दिले होते. त्यामधील आठ उमेदवार आमचे निवडून आलेले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधान मंडळ होते त्याच पद्धतीने आमचे आठ खासदार संसदेत अष्टप्रधान मंडळाप्रमाणे जनतेचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा आवाज बुलंद करतील अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा रोप्य महोत्सवी वर्धापन दिन नगर येथे देशव्यापी मेळावा राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित सोमवारी पार पडला. मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, विजय विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, उत्तमराव जानकर, मेहबूब शेख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे फौजीया खान, सलगर, नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, यासह नगर जिल्ह्यातील राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे अभिषेक कळमकर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, प्राजक्त तनपुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवडून आलेल्या आठही खासदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वच खासदारांनी शरद पवार यांचा येणाऱ्या ८५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना भेट म्हणून विधानसभेत पक्षाचे ८५ आमदार निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी तर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील आमदार महाविकास आघाडीचे असतील याची ग्वाही दिली. राज्यामध्ये विधानसभेवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकणार हे सांगत संसदेमध्येही आम्ही आठ खासदार शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव, रोजगार या मुद्यांसाठी जोरदारपणे आवाज उठवू अशी ग्वाही दिली. निलेश लंके यांनी तर वेळ आली तर संसदेचे कामकाज मी बंद पडेल पण शेतकऱ्यांच्या दूध आणि कांद्याला भाव दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे ठासून सांगितले.