पराभवातून खचलो नाही, तुम्हीही खचू नका..जिथे कमी पडलो तिथे संपर्क वाढवा..
विधानसभेत महायुतीची ताकत दाखवू..राहुरी,श्रीगोंदा लक्ष!!
महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत!! विरोधकांचा समाचार..
नगर:
लोकसभेचे निकाल लागून पाच दिवस उलटल्यानंतर रविवारी 29 हजार मतांनी पराभूत झालेले माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणेतील महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काहीसे भावनिक वातावरण झाले होते. भावनिक कार्यकर्त्यांना साद घालताना स्वतः सुजय विखेही काहीसे भावुक झाले होते. त्यांच्या भाषणातून पराभवाची सल आणि निराशा बोलण्यातून आणि चेहऱ्यावर काहीशी दिसत असली तरी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत पराभवाने खचू नका, जनतेत जा, जिथे कमी पडलो तिथे संवाद वाढवा, लोकांना समजून घेत आपलेसे करा. आरक्षण उठले म्हणून मी उत्तरेत जाणार नाही. नगर दक्षिणेचा 2029 चा खासदार महायुतीचाच असणार आहे. नगर जवळील एमआयडीसी पूर्ण करणारच. नगर दक्षिणेतील कार्यकर्ते माझा परिवार आहे, कर्डीले साहेब मला पितृतुल्य आहेत. असे सांगत आपण पराभूत झालो असलो तरी नगर दक्षिणेतील राजकारणात आव्हान कायम ठेवणार असल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
माझे कार्यकर्ते माझा परिवार..
-राधाकृष्ण विखें सारखे वडील मिळणे हे मी माझे भाग्य मानतो. त्यांनी माझ्या विजयासाठी दिवसरात्र खूप परिश्रम घेतले. कार्यकर्ते खूप झटले. काहींच्या बाबतीत मी आज बोलणार नाही. पण सहा लाख मते मला मिळाली, माझा निसटता पराभव झालेला आहे. त्यामुळे कोणीही उगाच खचून जाऊ नका. विधानसभेत माझी ज्यांना गरज वाटेल आणि मला बोलावतील तिथे मी नक्की जाईल. मात्र ज्यांना गरज वाटत नसेल तिथे उगाच जाणार नाही असे मोठे विधान करत निवडणूक काळात नाराजीची चर्चा असलेल्या नेत्यांना सुनावले.
विरोधकांच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे!!
-निवडून आलेल्या विरोधी उमेदवारांच्या विजयी मिरवणुकात पाकिस्तानचे झेंडे झळकल्या बद्दल सुजय विखे यांनी नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली. या प्रकाराचा निषेध त्यांनी आपल्या भाषणात केला.
विधानसभेला ताकत दाखवू..
-माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे.पराभव झाला असला तरी खचून झावू नका. आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा.जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला.
समर्थकांनी केला जयजयकार..
-निवडणूक निकालानंतर डाॅ सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केला.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वच कार्यकर्त्यांनी डाॅ विखे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करून सभागृह डोक्यावर घेतले.
आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत,विरोधकांना इशारा!!
-निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्याने आपल्याला काम सुरू करायचे आहे.त्यामुळे परभवाने नाराज होवू नका असे भावनिक आवाहन करून डाॅ विखे पाटील म्हणाले की निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत.पण तरीही सहा लाखांचे मतदान देवून जनतेन आपल्याला विश्वास दाखवला.यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही.पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत आशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
केंद्रात, राज्यात आपलेच सरकार..आश्वासन ने पूर्ण करू..
-लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे.विकास काम पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा.केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे.विकास कामांना मोठी मदत होणार आहे.नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महीनाभरात सुरू होईल जी आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटीबध्द राहणार असून कुठेही कमी पडणार नाही.कोणी काही चर्चा केल्यातरी २०२९ चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणार्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डाॅ विखे पाटील यांनी केले.
कर्डीले म्हणाले पराभवाची कारणे समोर आली आहे!!
-जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या भाषणात डॉ विखे यांच्या पराभवाची कारण खूप वेगळी आहे.त्याचे विश्लेषण समोर आले आहे.काही गोष्टीचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.पराभवाचे दुख असले तरी नाउमेद न होता सर्वानी एकसंघपणे पुन्हा कार्यरत राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.
अभिनंदनाचा ठराव..
-विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली याबाबत डाॅ सुजय विखे पाटील यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला सर्वानीच घोषणा आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.