Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
21.6 C
New York
Monday, August 25, 2025

युवकांना रोजगार आणि विकसित अहिल्यानगर हीच आपली भूमिका आणि उद्दिष्ट..

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सुजय विखे यांनी मांडली आपली भूमिका..


मतदार माझ्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.. सुजय विखे यांना विश्वास

नगर:
मतदार संघातील युवकांना रोजगार उपलब्ध करून  विकसित अहील्यानगरची ओळख नव्या स्वरुपात समोर आणण्याचे उद्दीष्ट आपण निवडणुकीच्या निमित्‍ताने मतदारांपर्यत मांडली. त्याला मतदार संघात सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संवाद साधताना खा.विखे पाटील म्हणाले की, केवळ निवडणुकी पुरतेच नाही तर विविध योजनांच्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण मतदार संघातील प्रत्येक सामान्य माणसाच्या संपर्कात राहीलो. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभरहून अधिक योजना सुरू केल्या. या योजना सुरू करतानाच कुठेही गरीब, श्रीमंत असा किवा जातीभेद निर्माण न करता सर्व योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल याचा यशस्वी प्रयत्न केला. शासन आपल्या दारी या उपक्रमातून योजना लोकांपर्यत पोहचविल्या त्यामुळेच शासन योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आज अहील्यानगर मध्ये आहेत.

मागील निवडणुकीत शहरातील उड्डाण पुलाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. ठरविलेल्या कालावधी पेक्षा आधीच हे काम सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने आज अहील्यानगरला जोडणा-या राज्य आणि राष्ट्रीय महमार्गाचे काम पूर्णत्वास गेले. बाह्यवळण रस्ता पूर्ण झाल्याने शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आज कमी झाली. भविष्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून संभाजीनगर-पुणे महामार्गाचे कामही लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. पुणे अहील्यानगर इंटरसिटी रेल्वेची मागणी होत आहे त्या कामासही गती देवून अहील्यानगरकरांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मी दिले आहे ते पूर्णत्वास नेणे हाच माझा प्रधान्यक्रम आहे.

- Advertisement -

सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार संघातील युवकांचा रोजगारचा प्रश्न महत्वाचा आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा आहेत पण नोकरीसाठी बाहेर जावे लागते. पण हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा याकरीता औद्योगिक विकास करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ना.अजित दादा पवार, महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर आणि श्रीगोंदा येथे औद्योगिक वसाहती करीता जागांची उपलब्धता करून दिली. आता नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत. त्यामुळेच अहील्यानगर एक औद्योगिक केंद्र विकसित करण्याचे आपला प्रयत्न आहेत.

मध्यंतरी महारोजगार मेळावा आयोजित केला होता. याचा उद्देश एकच होता की, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे. पण एक गोष्ट पुढे आली की, विद्यार्थ्यांना मुलाखत देण्यापासून ते कौशल्य प्रशिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. यासाठी अहील्यानगर येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.  अहिल्‍यानगर आयटी हब, अॅटो क्‍लस्‍टर, कृषि क्षेत्राची असलेली पार्श्‍वभूमी लक्षात घेवून शेतमाल प्रक्रीया उद्योग आणि फुडपार्क क्‍लस्‍टर उभारण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या सहकार्याने काम करण्‍याचा माझा भविष्‍यात प्रयत्‍न असणार आहे.

शहर आणि ग्रामीण भागात पायाभुत सुविधा निर्माण करण्यात आपण कुठेही कमी पडलो नाही. दोन वर्षे कोव्हीड संकटाची होती तरी आपण स्वस्थ बसलो नाही. समाजाकरीता काय करता येईल ते सर्व केले. दहा हजार कोव्हीड रूगणावर उपचार करण्याची सुविधा निर्माण केली. रेमडीसिव्हर मिळत नव्हते ते आव्हानांचा सामना करीत मिळवले, गरजू लोकांना किराणा वाटप केला. पण या संकटाचे कुठे प्रदर्शन आम्ही केले नाही. कारण विखे परीवार सामाजिक बांधिलकीने काम करणारा आहे. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेतून जिल्‍ह्यातील ४० हजार जेष्‍ठ नागरीकांना साधन साहित्‍याची करुन दिलेली उपलब्‍धता, महिला बचत गटांना स्‍वंय रोजगारासाठी उपलब्‍ध करुन दिलेले साहित्‍य, दिव्‍यांग व्‍यक्तिंना साहित्‍याची उपलब्‍धता करुन, त्‍यांच्‍या जीवनात आनंद निर्माण करण्‍याचा केलेला छोटासा प्रयत्‍न ही माझ्या कामाची खरी उपलब्‍धता आहे. केलेल्या कामाची प्रसिध्दी करून सहानुभूती मिळवायची हा दृष्टीकोन कधी माझा नव्हता आणि नाही.
भविष्यात खूप काम करायचे आहे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे सहकार्य असणे आवश्यक आहे. योगायोगाने केंद्रात पुन्हा भाजपची सत्‍ता  येणार आहे. तिस-यांदा मोदीजी पंतप्रधान होणार आहेत, राज्यात महायुतीचे सरकार आहे. अहील्यानगरच्या विकासाची हमी महायुतीने घेतली आहे. जिल्‍ह्याला असलेला साहित्य, कला आणि क्रिडा क्षेत्राचा वारसा लक्षात घेवून खेलो इंडिया योजनेची व्‍याप्‍ती जिल्‍ह्यातील खेळाडुंसाठी वाढवावी लागेल. शहरातील वाडीया पार्कया क्रिडा संकुलाचा विकास करण्‍यासाठी आपला प्रयत्‍न राहणार आहे. खेळाडुंच्‍या प्रशिक्षणासाठी माझे विशेष प्रयत्‍न राहतील. कला क्षेत्रातील व्‍यक्तिंना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी नॅशनल स्‍कुल ऑफ ड्रामा संस्‍थेची शाखा नगर मध्‍ये सुरु करण्‍याचा माझा प्रयत्‍न राहणार आहे.

प्रचाराच्या निमित्ताने मतदारासमोर विकसित अहील्यानगरचे व्हीजन डॉक्युमेट आपण मांडले आहे. व्यक्तिगत टिका टिपणीपेक्षा मला विकासाची भूमिका मांडल्याचे समाधान खूप मोठे आहे. मतदार सूज्ञ आहे. तो विचार करून मतदान करेल. शेवटी ही निवडणूक देशाची आहे, उज्वल भविष्यासाठी आहे. विकसित राष्ट्र निर्माण करताना विकसित अहील्यानगर निर्माण करण्यासाठी मतदार मला पाठबळ देतील हा विश्वास डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा