पाथर्डी: शहर प्रतिनिधी नितीन गट्टानी:
सेवा,त्याग,सदाचार या विचारावर माहेश्वरी समाज काम करत असून,देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देत आहे.तसेच सामाजिक व धार्मिक उत्सव अतिशय शांत व संयमी पणे साजरे करत सर्व धर्म समभावाचा वेगळा ठसा समाजाने उमटवला असल्याचे प्रतिपादन जि.प.च्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
माहेश्वरी समाजाच्या गण – गौर या वार्षिक उत्सवानिमित्त सोळा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.या उत्सवाच्या समारोपानिमित्त शहरातून शिवपार्वतीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी श्री माहेश्वरी राम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सौ घुले बोलत होत्या.
यावेळी जि.प.च्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे,समाजाच्या अध्यक्षा,उज्वला बाहेती,उमा बजाज,सिमा दायमा,अनुराधा हारकुट,मनीषा लाहोटी,कविता डागा,शिल्पा मंत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ढाकणे म्हणाल्या की,माहेश्वरी समाजातील महिला या पारंपारिक चालीरीती जपण्यासाठी वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.अशा कार्यक्रमात इतर समाजातील महिलांना सहभागी करून घेत उत्सवाचा आनंद त्या द्विगुणीत करतात ही बाब कौतुकास्पद असल्याचे ढाकणे म्हणाल्या.
माहेश्वरी समाजाचा सेवा,त्याग, सदाचारविचार स्पृहणीय -राजश्रीताई घुले
- Advertisement -