मुंबई:
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली आहे. यामध्ये शिर्डी मधून निवडणुकीच्या मैदानात सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. लोखंडे यांच्या नावाबद्दल सांशकता होती. मात्र दोन दिवसापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला कामाला लागा असा सूचना केल्याचे सांगत आपली उमेदवारी अंतिम झाल्याचे एक प्रकारे स्पष्ट केले होते. भारतीय जनता पक्षाने शिर्डीच्या जागेवर दावा सांगितलेला होता. मात्र अखेर विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांनाच एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुरुवारी सायंकाळी एकूण आठ उमेदवारांची घोषणा शिवसेनेचे सचिव संजीव मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे –
मतदार संघ
उमेदवार
1)३० – मुंबई दक्षिण मध्य-श्री राहुल शेवाळे
2)४७ – कोल्हापुर-श्री संजय मंडलीक
3)३८ – शिर्डी (अजा)-श्री सदाशिव लोखंडे
4)५ – बुलढाणा-श्री प्रतापराव जाधव
5)१५ – हिंगोली-श्री हेमंत पाटील
6)३३ – मावळ-श्री श्रीरंग बारणे
7)९ – रामटेक (अजा)-श्री राजू पारवे
8)४८ – हातकणंगले-श्री धैर्यशिल माने