देशाला मिळणार उपपंतप्रधान!! “संघा”च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
मुंबई:(राजेंद्र त्रिमुखे):-
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जून २००२ ते मे २००४ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी – NDA सरकार)लालकृष्ण अडवाणी हे स्वतंत्र भारताचे ७ वे आणि अंतिम उपपंतप्रधान होते. २००४ पासून आजतागायत (२०२६ मधील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळासह) हे पद भारतात कोणालाही देण्यात आलेले नाही आणि ते रिक्तच आहे. मात्र याबाबत आता 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भविष्यकालीन रणनीती भारतीय जनता पक्ष आणि पक्षाची मातृसंस्था आरएसएस मधे काही हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
वास्तविक या बदलांबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य ना भाजप नेते,मंत्री किंवा संघा कडून अद्याप पर्यंत केलेले नसले तरी याबाबत ठाकरे शिवसेनेनेचे राज्यसभा खा.संजय राऊत सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत दिसतील. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार असल्याचे राऊत वारंवार बोलत आहेत. यावर फडणवीस यांनी मी महाराष्ट्रात समाधानी असून असल्या कोणत्याही हालचालींचा इन्कारच केला आहे.
आता संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेत आतल्या वास्तव माहितीनुसार पंतप्रधान मोदी सरकार मध्ये उपपंतप्रधान नेमण्याचे ठरले असल्याचा दावा केला आहे. या पदावर भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जाईल किंवा भविष्यातील पंतप्रधान पदावरील दावेदार कोण असणार याबाबतचे खा.राऊत यांचे हे वक्तव्य असल्याने साहजिकच पुन्हा एकदा देशाचे उपपंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस असतील यावर चर्चा प्रस्तुत होत आहे. जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी खा.राऊत यांना दिल्ली आणि संघांतर्गत अधिकची माहिती असते, त्यामुळे असे काही निर्णय होऊ शकतात असे एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले आहे.
स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकार नंतर (2004) नंतर पुढे 2004 ते 2014 युपीए अथवा 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्या एनडीए सरकार मध्ये आतापर्यंत कुणाचीही उपपंतप्रधान म्हणून निवड झालेली नाही. कारण उपपंतप्रधान पदी असलेली व्यक्ती एक प्रकारे भावी पंतप्रधान मानली जाते. अटलबिहारी वाजपेयी काळातही अडवाणी यांच्याकडे या दृष्टीने पाहिले जात होते, मात्र 2014 ला एनडीए’ पराभूत झाल्याने अडवाणी यांना पुढील चाल मिळाली नाही. आणि युपीए सरकार मध्येही उपपंतप्रधान पदावर कुणालाही संधी दिली गेली नाही.
2014 पासून 2026 पर्यंत झालेल्या तीनही निवडणुकीत मोदी करिष्मा कायम राहिला आणि ते पंतप्रधान पदी निर्विवाद राहिले आहेत. मात्र 2026 ला भाजपच्या घटलेले संख्याबळ, विविध राजकीय घडामोडी, मोदी यांचे वय, आणि जेन झी आंदोलनाने निर्माण झालेले वातावरण पाहता 2029 ला लोकसभेला सामोरे जाताना संघ आणि भाजप नव्या रणनीती नुसार जाण्याचे ठरवत असल्याचा दावाच एक प्रकारे खा.राऊत यांच्या वक्तव्यातून होत आहे.
फडणवीस आणि संघाच्या मध्ये याबाबत बोलणी झाल्याचे दावाही केला जात असून नजीकच्या काळात लवकरच देशाच्या उपपंतप्रधान पदावर नवा चेहरा दिसेल असे राऊत यांचे म्हणणे आहे. हा चेहरा अर्थातच फडणवीस यांचा असेल या चर्चेनें जोर पकडला असून ते 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील आणि हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका वा निर्णय असल्याचीही मोठी चर्चा आहे. या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रात मोठी उत्सुकता आहे कारण यानिमित्ताने पंतप्रधान पदासारखे सर्वोच्च पद महाराष्ट्राकडे येणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार!!
-केंद्रीयमंत्री शिवराज सिंग, राजनाथ सिंह अशा काही मंत्र्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितला गेला मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार देताना जर आमचे राजीनामे घ्यायचे असतील तर सर्वात अगोदर गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या, त्यांच्यापासून सुरुवात करा मग आमचे राजीनामे मागा, असे सांगितल्याचीही मोठी चर्चा आहे. या चर्चेला जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी एका वाहिनीवर बोलताना पृष्ठी केली आहे.

