Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
2.9 C
New York
Monday, October 19, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळालाजामखेड तालुक्यातील पॉवरफुल नेता प्रा. सचिन गायवळ.. तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार!!

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्या नंतर जामखेड तालुक्यात पॉवरफुल असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता प्रा. सचिन गायवळ यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या गटात प्रवेश करून तालुक्यात अजित पवार गट जिवंत केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत प्रा. सचिन गायवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ  साथ देऊन व तालुक्यातील 35 ते 40 ग्रामपंचायत व पंचायत समितीत सत्ता आणण्यात गायवळ बंधुचा मोठा वाटा होता. प्रा. सचिन गायवळ यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
    
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फुटीनंतर तालुक्यातून अजित पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश युवतीच्या उपाध्यक्ष संध्या सोनवणे व ज्योतीताई गोलेकर यांनी प्रवेश केला होता पण त्यानंतर उघडपणे कोणी नेता, कार्यकर्ता अजित पवार समर्थक असूनही जाण्याचे धाडस  करीत नव्हते. तालुक्यातील राष्ट्रवादीतील अनेक नेते कार्यकर्ते नाराज आहेत ते सध्या तळ्यात-मळ्यात आहे. आठ दिवसांपूर्वी माजी नगरसेवक व युवा कार्यकर्ता पवनराजे राळेभात यांनी आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.
   
प्रा. सचिन गायवळ हे जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी आहेत. यापूर्वी ते पुणे येथील कॉलेजमध्ये स्पोर्टचे प्राध्यापक आहेत ते पुणे जिल्हा बॉस्केटबॉल जिल्हाध्यक्ष आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारे, मंत्री धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ असून 2018 ला धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा पासून ते कर्जत जामखेड तालुक्यात सक्रिय झाले होते. आ. रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी व तालुक्यातील 35 ते 40 ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला यश मिळवून दिले होते. व भाजपच्या ताब्यात असलेली पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणून चमत्कार घडवला होता. प्रा. सचिन गायवळ व सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांचे तालुक्यातील प्रस्थ वाढत चालले तसेच तरुणांचे आकर्षण ठरत चालले यामुळे पक्षातील काही लुडबुड करणा-या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींचे कान भरले त्यामुळे गायवळ यांना बाजुला केले गेल्याचे बोलले जात होते. आपल्याला निग्लेट करण्याचा प्रयत्न केला तसेच तालुक्यातील इतर महत्त्वाच्या निवडणूकीत त्यांना डावलण्यात आले यामुळे गायवळ नाराज होऊन आ. राम शिंदे यांच्या बरोबर त्यांची जवळीक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
      
राज्यातील राजकारणात राष्ट्रवादीतील अनेक घडामोडी घडल्या पक्षात झालेले बंड व त्यानंतर पक्ष आणि चिन्हाचा वादात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह दोन्हीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहतील असा निकाल दिल्यानंतर प्रा. सचिन गायवळ यांनी जामखेड शहरात अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावुन एकच खळबळ उडवून दिली आहे.
     
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा कोण असेल यांची उत्सुकता होती मात्र प्रा सचिन गायवळ यांनी अभिनंदनाचे बॅनर लावुन उघडपणे अजित पवार गटाला शुभेच्छा दिल्याने आता अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जामखेड तालुक्यातील नेतृत्व कोण करणार हे आता स्पष्ट झालं आहे. प्रा सचिन(सर) गायवळ यांच्या निर्णयाने अनेकांना राजकीय धक्का बसणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा