Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

ओबीसी  महाएल्गार मेळावा प्रवेशद्वाराला “संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे” यांचे नाव..

दिग्गज ओबीसी नेत्यांची असणार उपस्थिती..

नगर:
नगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रो दुपारी 3 वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळावेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते  छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय बडेट्टीवार, आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आ.प्रकाशजी शेंडगे, आ.रामजी शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मणराव गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी.टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुंढे, लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.

- Advertisement -

या मेळाव्याच्या निमित्ताने आज गुरुवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी नेत्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली असून विविध जिल्ह्यातून ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने येणार असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यास 52 जातींच्या संघटनांनी पाठिंबा दिल्याचं यावेळी स्थानिक आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं.

ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे असे नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली वंजारी या ओबीसी समाजातून पुढे आलेले आणि केवळ वंजारी समाजास नव्हे तर समाजातील पीडित दुर्बल जातींसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे दिवंगत नेते माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचं नाव देण्यात येणार असल्याने एक प्रकारे त्यांचा गौरव या निमित्ताने होणार आहे

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दयावे. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे. परंतु मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र?असंतोष व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे.

या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संखेने ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यबस्था पांजरपोळ मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, YMC मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड, येथे करण्यात आलेली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी

अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे. लोकनेते कै. बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा