Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.5 C
New York
Tuesday, June 17, 2025

छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष..

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याची तयारी पूर्ण..

दिग्गज ओबीसी नेत्यांची असणार उपस्थिती..

नगर:
नगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रो दुपारी 3 वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळावेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते  छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय बडेट्टीवार, आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आ.प्रकाशजी शेंडगे, आ.रामजी शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मणराव गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी.टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुंढे, लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.

मेळाव्यास छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याने ते या मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाला बाबत सरकारने काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या अनुषंगाने काय रोखठोक भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सध्या रोजच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधील वाद प्रतिवाद सुरू असून यामुळे एकूणच महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघालेले आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज 3 फेब्रुवारीला एकवटणार असल्याने मेळाव्यामध्ये छगन भुजबळ सध्याच्या आक्रमक शैलीत काही भाष्य करणार तसेच विजय वडेट्टीवार झ गोपीचंद पडळकर आदी नेते सरकारच्या अध्यदेशा बाबत कोणती जाहीर भुमीका समाजासमोर मांडतात याची उत्सुकता असणार आहे.

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दयावे. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे. परंतु मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र?असंतोष व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे.

या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संखेने ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यबस्था पांजरपोळ मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, YMC मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड, येथे करण्यात आलेली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी

अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे. लोकनेते कै. बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा