Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
8.6 C
New York
Tuesday, October 20, 2026

ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांच्या सोबत असणार!!

मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांना प्रवर्तन निर्देशालाय अर्थात ईडी’ने चौकशीचे समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी 24 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगितले आहे. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो मधील आर्थिक गोष्टींबाबत प्रवर्तन निर्देशालय विभाग चौकशी करणार असल्याचे बोलले जात असून त्यामुळे आ. पवार अडचणीत येणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर 24 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी आज मंगळवारी रोहित पवार यांनी एक पोस्ट समाज माध्यमात केली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना आ.रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाते वेळी सोबत आजोबा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आत्या खा.सुप्रिया सुळे हे दोघेजण सोबत येणार असल्याची माहिती दिली आहे. “वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे.”,  अशी भावना रोहित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये केली आहे.

- Advertisement -

काय आहे आ.रोहित पवार यांची पोस्ट..

“#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!

- Advertisement -

माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!

#लडेंगे
#जीतेंगे”

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा