Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

जिल्हाध्यक्ष निवडीवरून आरपीआय आठवले गटात घमासान.. सुनील साळवे  आठवलेंच्या भेटीला..

अहमदनगर:
केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौर्यावर येत असून त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नुकतीच राहुरी इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कर्जत तालुक्यातील संजय भैलूमे यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीवर दक्षिण जिल्ह्यध्यक्ष पदावर कार्यरत असलेले सुनील साळवे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे. याबाबत साळवे यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, निवडणूक निर्णय अधिकारी बी. के.बर्वे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीनंतर सुनील साळवे यांना मुंबई मध्ये रामदास आठवले यांनी तातडीने बोलावले आहे. विशेष म्हणजे श्रीकांत भालेराव यांनीच 20 ऑगस्ट 2022 रोजी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारीणी जाहीर केली होती.
या कार्यकारिणीला राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ  सरवदे यांनी मान्यता दिली होती आणि या कार्यकारीणीची मुदत संपलेली नव्हती अशी माहिती खात्रीशीर मिळत आहे.

याबाबत सुनील साळवे यांनी रामदास आठवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यात संपर्कप्रमुख भालेराव यांच्या माध्यमातून मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे आणि त्यामुळे पक्ष संघटना चालवण्यात येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. पत्रात आर्थिक हित पाहून निर्णय होत असल्याचा गंभीर आरोप असल्याने तसेच जिल्हाध्यक्ष पदावरील निर्णय पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचे सांगण्यात आल्याने याबाबत थेट राज्य निवडणूक आयोगा कडे जाण्याची भूमिका सुनील साळवे यांनी दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. आपल्या कामातून ठसा उमटवलेल्या सुनील साळवे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी आश्चर्यचकित झाले असून आठवले यांच्या भेटीला हे सर्व पदाधिकारी जाणार असल्याचे समजते आहे. साळवे यांनी पक्षाच्या संपर्कप्रमुख आणि राज्य उपाध्यक्ष वाकचौरे यांच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिल्याने वरिष्ठ पातळीवरून तातडीने दखल घेतली असल्याने सुनील साळवे यांना बुधवारी तातडीने मुंबईत चर्चेला बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा