Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

जामखेड शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाला अभिवादन तर श्रीराम मंदीरात विविध कार्यक्रम

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व भव्य मंदिर लोकार्पण सोहळया निमित्त जामखेड शहरात बीड कॉर्नर येथे श्रीराम मंदीराची प्रतिकृती तसेच प्रभू रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळी श्रीरामाच्या गाण्यावर लेझर शो दाखवण्यात आले. तसेच शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचे फोटो लावून अभिवादन करण्यात आले व महाप्रसाद वाटप करण्यात आला.


   
शहरातील श्रीराम मंदिरात सकाळी साडेपाच वाजता अभिषेक करण्यात आला. सात ते साडेअकरा पवमान स्वाहाकार, साडेअकरा वाजता पूर्णाहुती, बारा वाजता अयोध्येतील श्रीराम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापणा प्रक्षेपण १२.२० ला महाआरती व महाप्रसाद, दुपारी ३.०० वाजता गीत रामायण..भजन ( महिला वर्ग ), संध्याकाळी ७.०० वाजता श्री रामरक्षा आणि दीपोत्सव अयोजीत करण्यात आला.
  


जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामाची प्रतिकृती करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांनी यावेळी १९९२ साली कारसेवेमध्ये सहभागी असलेल्या कारसेवकांचा गौरव केला यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा