Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
14.5 C
New York
Friday, October 16, 2026

कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे “आमंत्रण” राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!!

विखेंचे आमंत्रण राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!!

अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे): अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वी फक्त विखे आणि थोरात यांच्याभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत आले. विधानसभ, लोकसभा असो किंवा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महत्त्वाची समजली जाणारी जिल्हा सहकारी बँक असो.. या सर्व सत्तांवर कोण कुठे असणार याचे निर्णय आणि त्यासाठीचे खेळले जाणारे राजकारण  राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात हे कधीकाळी काँग्रेस ह्या एकाच पक्षात असलेल्या या दोन महत्त्वाच्या दिग्गज नेत्यांभोवती अनेक वर्ष फिरत राहिले. यांच्यातील कधी उघड संघर्ष तर अंतर्गत राजकारण याची चर्चाही विविध माध्यमातून रंगत राहिली. मात्र विखे असो किंवा थोरात यांनी जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम ठेवण्याची एकही संधी कधीही सोडली नाही.

स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे यांची जिल्हा विकास आघाडी या माध्यमातून जिल्हा परिषद किंवा जिल्हा सहकारी बँक या निवडणुका कधी लढवल्या गेल्या. थोरात यांनी आपली राजकीय बाजी लावत आपले जिल्ह्यातील नातेसंबंध आणि कार्यकर्ते नेत्यांची फळी वापरत विखेंना तोडीस तोड देत जिल्हा सोबतच राज्यातील राजकारणातही आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र 2014 ला मोदी लाटेनंतर जिल्ह्यातील राजकारण हळूहळू बदलू लागले आणि त्यानंतर विखे परिवार भारतीय जनता पक्षामध्ये 2019 ला गेल्यानंतर एकूणच जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक येथील राजकारण पूर्णपणे बदलून गेले.

- Advertisement -

जिल्ह्यात भाजपाचे त्याचबरोबर आता महायुतीचे म्हटल्यास वर्चस्व असल्याने आता लवकरच होणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विखे यांना वर्चस्व मिळवणे गरजेचे आहे. मात्र थोरात यांची ताकद कुठे कमी पडत असली तरीही त्यांचीही रणनीती विखें वितोधकांना सोबत घेऊन सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेपासून जिल्हा बँकेचे नेहमीच आकर्षण राहिलेले राम शिंदे यांनीही आपली जिल्हा बँकेसंदर्भातली वर्चस्वाची लढाई सुरू केलेली आहे. याबाबतची त्यांची जुनी नाराजीही त्यांनी अधून मधून व्यक्त केलेली आहे.

एकूणच आता जिल्हा बँकेची नजीकच्या काळात होणारी निवडणूक जिल्ह्यात मोठी चर्चेचा विषय ठरली असून ही निवडणूक विखे विरुद्ध राम शिंदे अशी होणार असंच एकंदरीत चित्र सध्या दिसून येत आहे. बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी विखे आणि थोरात हा गटही एकत्रित येऊ शकतो असंही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर विखे आणि राम शिंदे यांच्यातील दुरावा हा गेल्या काही दिवसांपासून स्पष्टपणे जाणवत आहे. अनेक कार्यक्रमात ते एकत्र येऊनही त्यांच्यात बोलणे होत नाही हे दिसून आलेले आहे. नुकत्याच झालेल्या 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमातही विखे आणि राम शिंदे यांच्यातील दुरावा हा दिसून आला. दोघेही दिग्गज नेते आता संविधानिक पदावर असल्याने राज्याच्या राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे आणि त्यामुळेच एकाच पक्षात असले तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे यासाठी विखे यांनी कंबर कसली आहे. तर राम शिंदेंनी आपली रणनीती सुरू केली आहे. विखें कडून  बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिलेला दिसून येतोय आणि त्यामुळेच त्यांनी नुकतेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवारानगर लोणी येथे बोलावले होते आणि त्या स्वतः जातीने हजर होत त्यांनी विखे परिवाराचे कौतुकही केले.

- Advertisement -

त्यानंतर आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने लोणी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिक्षक दिनाच्या  शासकीय कार्यक्रमा साठी कार्यक्रमासाठी  छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे असतील असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे या निमित्ताने त्यांनी राम शिंदे यांना उत्तरेत कार्यक्रमाचे आयोजन असल्याने निमंत्रित करून रणनीती खेळण्याचा प्रयत्न केलेला असल्याची मोठी चर्चा आहे. हे सर्व जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने याचे विविध कंगोरे वृत्तपत्र माध्यमातून दिसून येत आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येणार का यावर मोठा उहापोह होत असताना शिंदेंची उपस्थिती वा अनुपस्थिती त्यांच्या भविष्यकालीन रणनीती दाखवणारी ठरू शकते. कार्यक्रम शासकीय असल्याने मात्र लोणीत असल्याने शिंदे कशी भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. शासकीय कार्यक्रम पूर्वनियोजित असतात, त्यामुळे कार्यक्रमाची कल्पना किंवा उपलब्धता संबंधितांना असणे अपेक्षित असू शकते.

त्यामुळे शासनाचा असला तरी लोणीत असलेल्या कार्यक्रमास  राम शिंदे उपस्थित असतील का याबद्दलची मोठी उत्सुकता जिल्ह्यामध्ये आहे. मात्र जिल्हा माहिती कार्यालयाने त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम शिंदे यांचा आज पाच पाच सप्टेंबरचा दौरा हा चौंडी येथून कर्जत तालुक्यामध्ये आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने असून अनेक मोठा कालावधी त्यांनी राखीव असल्याचं ठेवलेला आहे. कर्जत येथूनच पुन्हा चौंडी येथे निवासस्थानी जाण्याचे आयोजन असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या आजच्या दौऱ्यातून दिसून येत आहे. यामुळे राम शिंदे यांनी एक प्रकारे लोणीत असलेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार कार्यक्रमास अनुपस्थित  वाटण्याचा संभव आहे कारण शासकीय अधिकृत दौऱ्यामध्ये कुठेही लोणीतील शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही.  त्यामुळे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी उपस्थिती कर्जत तालुक्यात असल्याचं राम शिंदे यांच्या दौऱ्यात आहे आणि त्यामुळे ते लोणीला जाणार नाहीत अशी शक्यता एकंदरीत बोलली जात आहे.

मात्र राम शिंदे ऐनवेळी लोणी ला जाण्याचा निर्णय घेतील का याबद्दलची उत्सुकताही असणार आहे. ती प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र एकंदरीतच जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने  पूर्वी विखे विरुद्ध थोरात असलेली रंगत आता विखें विरुद्ध राम शिंदे अशी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा