Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
14.5 C
New York
Friday, October 16, 2026

मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी..

मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी..

भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी

संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून घेतली मंजूर कामांच्या आराखड्याची माहिती; प्रत्यक्ष जागेवर घेतला आढावा

- Advertisement -

अहिल्यानगर :
अहिल्यानगर(पूर्वीचे अहमदनगर) शहर तसे देशातील मोजक्या स्थापित शहरांपैकी एक ऐतिहासिक शहर. पाचशे वर्षांपेक्षा अधिकचा ईतिहास शहराला असताना आणि अनेक भव्य-दिव्य ऐतिहासिक वास्तू आणि स्वातंत्र्य संग्रामातील संदर्भ असताना शहराची ओळख एक मोठं खेड अशीच गणली गेली आहे. राज्याच्या राजकारणात जिल्ह्यातील अनेक राजकीऊ नेते प्रस्थापित झाले आणि गेले मात्र जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराला प्राप्त झालेल्या ऐतिहासिक ठेव्याला कोणी झळाळी देऊ शकले नाही. पर्यायाने एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ ठरू शकणारे आणि त्यामाध्यमातून  हजारो रोजगार निर्माण करू शकणार्या वास्तू अडगळीत पडल्या अशी स्थिती आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक स्थळांना विशेषतः लष्कराच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्याच्या पुनर्जीविवनाला सुरुवात झाली. सुरुवात झाली खरी, मात्र किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्याने लष्कर आणि महाराष्ट्र शासन यात समनव्य नसल्याने म्हणा अथवा इच्छा शक्तीचा अभाव म्हणा भुईकोट किल्ला दुर्लक्षित राहिला होता. आता मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे, यांनी केंद्रीय पातळीवर हालचाली करून लष्करी विभाग आणि महाराष्ट्र प्रशासन यांत सामंजस्य करार घडवून आणला असून शासकीय पातळीवर भुईकोट किल्ला विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या निमित्ताने लवकरच विविध कामांना सुरुवात होणार असल्याने त्यादृष्टीने मंगळवारी( 9 सप्टेंबर)ला माजी खा.सुजय विखे पाटील यांनी भुईकोट किल्ल्याची पाहणी केली.

शहरालगतच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून मंजूर झालेल्या कामांच्या संपूर्ण आराखड्याची माहिती घेत, प्रत्यक्षात किल्ल्याच्या कोणत्या भागात काय होणार आहे, याचा जागेवरच आढावा घेतला.

- Advertisement -

डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी केली. प्रस्तावित कामांची रचना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, परिसराचे नियोजन तसेच पर्यटकांच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी संबंधितांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाहणीदरम्यान आराखड्यातील कामांची प्रत्यक्ष जागेशी सांगड घालत आवश्यक त्या बाबींवर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या ठिकाणी आवश्यक बदल किंवा सुधारणा करणे गरजेचे आहे, त्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. ऐतिहासिक वारशाचे मूळ स्वरूप आणि महत्त्व जपतच पुढील नियोजन करण्यात यावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

भुईकोट किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लष्करी प्रशासनासोबतचा सामंजस्य करार (MOU) हा महत्त्वाचा टप्पा होता. हा विषय मार्गी लागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पातळीवर झालेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे MOU पूर्ण झाला असून, आता मंजूर आराखड्यानुसार पुढील प्रक्रिया मार्गी लागली आहे.

किल्ल्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तू, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भांचे जतन करून ते नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे नियोजन आहे. ‘Discovery of India’सह सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांनाही या माध्यमातून उजाळा मिळणार आहे.

भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासाचा आणि अस्मितेचा महत्त्वाचा ठेवा आहे. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करत त्याला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने मंजूर आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी करून डॉ. विखे पाटील यांनी कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा