Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

नाशिक मधील प्रसिद्ध व्यापारी अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी शिर्डीतून जेरबंद

नाशिक गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या विभागाची धडाकेबाज कारवाई..

व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपी शिर्डीतुन अटक

विशेष पथक, गुन्हे शाखा नाशिकची कामगिरी

- Advertisement -

नाशिक:
सविस्तर हकीकत अशी की विशेष पथकांचे पोउपनि मुक्तेश्वर लाड व पोअं भगवान जाधव, पोना/ भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिलाकी की, म्हसरूल पोलीस ठाणे गु.र.नं 54/2024, कलम 363,364,386,387,395 भांदवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयेंच्या खंडणीसाठी शहरातील व्यापा यांचे अपहरण करून त्यास मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रूपये खंडणी घेणा या टोलीतील, गुन्ह्या झाल्यापासुन फरार असलेला मुख्य सुत्रधार व त्यांचा साथिदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्यांची माहिती मिलाल्यावरून सदरची माहिती संदिप मिटके सपोआ गुन्हे यांना देण्यात आली, मा. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिडी येथे रवाना झाले तसेच शिर्डी मदतीने गुप्त बातमीतील आरोपींच्या शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्यांची माहिती मिलतांच पथकाने शिडों पोलीसांच्या मदतीने वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपुस करता त्यांनी त्यांचे नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर, वय 23 वर्ष, रा. महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक, 2) शुभम नानासाहेब खरात, वय 25 वर्ष, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर MIDC, नाशिक आरोपी असे सांगीतले त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करता वर नमुद गुन्हा केल्यांची कबुली देऊन, गुन्हा केल्यापासुन फरार झ वाल्यांचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपासकामी म्हसरूल पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता, शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरनाचा कट रचला होता.

*सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त) सो, मा.श्री. प्रशांत बच्छाव सौ (पोलीस उप आयुक्त गुन्हे), मा. श्री. संदिप मिटके सो (सपोआ गुन्हे), सपोनि श्री. ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि श्री. मुक्तेश्वर लाड, श्रेपोउनि दिलीप भोई, पोह/106 किशोर रोकडे, पोना/911 दत्ता चकोर, पोना/1533 रविंद्र दिघे, पोना/497 भुषण सोनवणे, पोअं/2389 भगवान जाधव, पोअं/869 अनिरूद्ध येवले, सर्व नेमणुक विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केली आहे.*

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा