Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
8.6 C
New York
Tuesday, October 20, 2026

विजयाचा उद्रेक करणाऱ्या लंके समर्थकांना आवरा!! भाजपच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

राहुल झावरे यांनी गर्भवती महिलेला मारहाण करत कपडे फाडले, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप..

पारनेर मध्ये लंके समर्थकांच्या भीतीने तोफखाना पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल!!

पारनेर(सुपा):
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी  घरात घुसून गर्भवती महीलेवर केलेल्या  हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला, तुम्ही उद्रेक करून  विजयाचा आनंद घेवू नका आशा शब्दात भाजपा  पदाधिकार्यांनी निलेश लंके यांचा  समाचार घेतला. काल खा.निलेश यांचे नजीकचे सहकारी ऍड.राहुल बबन झावरे यांच्यावर पारनेर शहरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्या प्रकरणी विखे समर्थक माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी आदींवर गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सुप्यात भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि मारहाणीचा आरोप करणाऱ्या पीडितेने यांनी पत्रकार परिषद घेत खा.लंके समर्थक ऍड.राहुल झावरे आदींवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांशी बोलताना, महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहे.गुरूवारी गोरेगाव येथे विखे समर्थकाला शोधण्यासाठी लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी  ग्रामपंचायत कार्यालयात गेले.तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी  व आईला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना  मोठ्या प्रमाणात माराहाण केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष राहूल शिंदे यांनी केला. निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले.

पीडितेचे राहुल झावरेंवर गंभीर आरोप..
मारहाण झालेल्या पीडितेने  पत्रकार परिषदेत राहूल झावरे यांचे थेट नाव घेवून त्यांनी व त्याच्या समवेत आलेल्या सहकार्यानी माराहाण केली.मी गर्भवती असून पोटातही लाथा मारल्या. माझे कपडे फाडून तुझ्या नवर्याला आजच मारून टाकणार असल्याच्या धमक्या दिल्या याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली असल्याचे पीडिता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

भीतीपोटी नगरच्या तोफखान्यात तक्रार दाखल!!
काल गावात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती.भीतीपोटी पोलीस स्टेशनलाही जाणे शक्य नव्हते.म्हणून आज नगर येथे तोफखाना पोलीस ठाण्यात जावून आपण फिर्याद दिली असल्याचे पीडितेने सांगितले.

विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देऊ नका -दिलीप भालसिंग
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली. आम्ही पराभव स्विकारला आहे.पण तुम्ही विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेवू नका तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत असा सवाल भालसिंग यांनी केला.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या घटनेतील सहभागी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या बाजूने काम केल्याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून लंके समर्थकांकडून विखे समर्थक कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून धमकावले जात आहे.दोन तीन दिवसांपासून हे प्रकार घडत आहेत.काल घरांवर दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या घटनाही घडल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा