Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.6 C
New York
Tuesday, June 17, 2025

रात्र प्रहरी संगमनेरात थोरात-लंकें मध्ये काय झाली गुफ्तगु!!

निलेश लंके यांनी घेतली काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांची भेट..

संगमनेर:
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पारनेर तालुक्याचे युवा आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी आ.निलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात व पारनेरचे राहुल झावरे हे होते. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत.

- Advertisement -

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. सातत्याने विधानसभेत नवीन आमदारांना मदत व मार्गदर्शन करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे आ.निलेश लंके यांनी सांगितले.

तर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, आ.निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे.सामान्य जनतेसाठी झटणारा पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम सातत्याने करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिण मध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके यांचे मोठे यश राहणार आहे.

- Advertisement -

हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगताना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे नक्कीच विजय होतील अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा