Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
4.1 C
New York
Tuesday, February 17, 2026

घनश्याम आण्णा शेलार लोकसभा लढवणार!! या तारखेला होणार घोषणा!!

श्रीगोंदा:
नगर दक्षिण मतदार संघातील प्रश्नांची जाण व त्या प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता असलेल्या जेष्ठ नेते घन:शाम शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची व सामान्य जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी  मतदारसंघातील जवळपास 100 वर  कार्यकर्त्यांनी शेलार यांची शनिवारी (दि.30 ) भेट घेतली होती.लोकसभा निवडणूकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेवून निर्णय घेवू असे शेलार यांनी सांगितले आहे.

त्या अनुषंगाने शेलार समर्थकांचा मेळावा येत्या 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बीआरएसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर यांनी दिली आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आनंदकर  म्हणाले की, गेली जवळपास 40 वर्षे  राजकारण व समाजकारणात  सक्रिय असलेल्या घन:शाम शेलार यांना श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण नगर दक्षिण मतदार संघातील प्रश्नांची माहिती आहे. व या प्रश्नांची सोडवणूक करण्याचीही त्यांची क्षमता असल्याने लोकसभा निवडणूकीत ते एक उत्तम पर्याय ठरु शकतील. 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात एक संघर्षयोध्दा अशी त्यांची प्रतिमा आहे. घोड, कुकडीचा पाणी प्रश्न, साकळाई उपसा सिंचन योजना, तालुक्यातील रस्ते व वीजेच्या प्रश्नांसंदर्भातही त्यांनी सातत्याने लढा दिलेला असून सामान्य जनतेला त्यांचाच आधार वाटतो.शेलार यांनी यापूर्वी जिल्ह्यात व राज्यस्तरावरही काम केलेले असून त्यांची कामाची हातोटी त्यांना लोकसभा निवडणूकीत निश्चितपणे तारणारी ठरु शकते. सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शेलार यांनी लोकसभा निवडणूकीत उमेदवारी करण्याची आमची मागणी आहे.

शेलारांना उमेदवारी करण्याचे साकडे घालण्यासाठी मतदारसंघातील प्रमुख 100 वर कार्यकर्त्यांसह आपण काल शनिवारी त्यांची भेट घेवून उमेदवारी करण्याचा आग्रह केला आहे. उपस्थित कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका समजून घेतल्यानंतर शेलार यांनी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून व त्यांच्याशी विचार विनिमय करुन यासंदर्भातील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिल रोजी मतदारसंघातील घन:शाम शेलार  यांच्या सर्थकांचा मेळावा श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी सहकारी कार्यकर्ते व मित्र परिवारासह उपस्थित रहाण्याचे आवाहन आनंदकर यांनी केले आहे. या मेळाव्यातच बहुधा शेलार आपली उमेदवारीची घोषणा करू शकतात.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा