पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींना जिवंत जाळले..
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील घटना..
नगर :
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील सुनील लांडगे याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून घरातच जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध संतप्त भावना व्यक्त केली जात आहे
आरोपीने हे निर्दयी कृत्य संशयाच्या कारणाने आणि दारूच्या नशेत केल्याची चर्चा आहे. दरम्यान दारूच्या नशेत असलेला आरोपी सुनील लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत पत्नी लिलाबाई ( २६), मुलगी साक्षी (१४वर्षे) खुशी (९ महिने) या तिघांचा जळून मृत्यू झाला..जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते. ते जळून खाक झाले. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. मात्र दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.. सुनील लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले .