Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
15.7 C
New York
Thursday, October 15, 2026

ढाकणेंचा सूचक इशारा..गुन्हेगारांना पाठीशी घालू नका..कानून के हाथ लंबे होते है!!

पाथर्डी(प्रतिनिधी सोमनाथ पाटील बोरूडे):
-पाथर्डी तालुक्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये चोरी, दरोडे, पशुधन चोरी, विद्युत मोटार चोरी, वाहन चोरी, कापूस चोरी, शेळ्या चोरी, व जमीन लुटणे, प्लॉट लूटणे, बळजबरीने ताबा घेणे, तसेच शहरात बिहार सारखी परिस्थिती उद्भवली त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी बाबासाहेब ढाकणे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू ढाकणे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष भगवान दराडे, अँड सुनील राजळे, गहिनीनाथ शिरसाट, महेश दौंड, दिनकर पालवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडेकर, राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष देवा पवार, शहर अध्यक्ष योगेश रासने, अर्जुन धायतडक, संदीप पालवे, उध्दव माने, अंबादास जगताप, आदी उपस्थित होते.

पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी मंडळींनी अनेक गोरगरीब नागरिकांना दहशत निर्माण करून त्रास दिला जात आहे. पाथर्डी तालुक्यात व शहरात बिहार सारखी परिस्थिती उद्भवली आहे  गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. चोरी-दरोडे, तसेच व्यापारी पेठेत दांडगे घेऊन फिरने, जमीन बळकवणे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना जास्त कडक शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी बोलताना अँड प्रताप ढाकणे, म्हणाले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कोणत्याही लोक प्रतिनिधींनी पाठीशी घालू नये पाच वर्षांत शेवगाव पाथर्डीचे बिहार झाले आहे. याला पोलीस आता पुर्ण पदावर आणतील असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी टाकळीमानुर येथील टाकळीमानुर येथील दरोड्यातील आरोपींना अटक केल्या बद्दल पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानप, अमोल आव्हाड, आदी उपस्थित होते.

पोलिसांनी ठोस भूमिका घ्या,कारण कानून के हाथ.. प्रताप ढाकणेंचा सूचक इशारा!!
-पाथर्डी शहरात व परिसरात गुन्हेगाराचे प्रमाण वाढलेले असून नेमके अशा गुन्हेगारांना कोण पाठीशी घालताय यावर पोलिसांनी आता ठोस भूमिका घ्यायला हवी कानून के हात बहोत लंबे होते है हे आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. तसेच पेठेत दोडके घेऊन फिरुन व्यापारीवर दहशत निर्माण करून व हॉस्पिटल वर हल्ला करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी आता स्वतः फिरादी होऊन मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांतून पुढे येऊ लागली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा