Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
3.8 C
New York
Sunday, October 18, 2026

भास्कर मोरेला वनविभागाची चार दिवसांची पोलीस कोठडी

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठण ):
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेला काल जामखेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. यावेळी वनविभागाने ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भास्कर मोरेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर विरोधात गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांचे उपोषण सुरु आहे. दि १३ रोजी नगर एलसीबी व जामखेड पोलीसांनी भास्कर मोरेला अटक केली होती. काल जामखेड न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी होती आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. याचवेळी वनविभागाने भास्कर मोरेला हरीण पाळल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

वनविभागाने दि. १० मार्च रोजी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन परिसरात तपासणी केली होती यावेळी एक जखमी हरीण आढळून आले होते. यानुसार वनविभागाने रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. यावेळी साहाय्यक वन संरक्षक राहुरी गणेश मिसाळ, मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड, वनरक्षक प्रविण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग, दक्षता पथक बडे डी एम, बी एस भगत, ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली होती.

- Advertisement -

तसेच वनविभागाला अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या काही हरीण मारून पुरले आहे अशी तक्रार होती तेव्हा जेसीबी च्या साहाय्याने अनेक ठिकाणी शोधकार्य सुरू होते यावेळी काही प्राण्यांचे केस व एक हाड आढळून आले होते. तपासणी साठी नागपूर येथे फाँरेन्शिक लँबकडे पाठवले आहे.
तसेच कालही काही प्राण्यांचे शिंग आढळून आले होते यानुसार ही तपासणी सुरू आहे.

वन्य जीव संरक्षण कायद्याखाली भास्कर मोरे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आता जर तपासणी मधे हाड व शिंगे कशाचे निघतात यानुसार परत भास्कर मोरे च्या अडचणीत वाढ होणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा