Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.6 C
New York
Tuesday, June 17, 2025

सुप्यात वाजली तुतारी!!माझा नेता अजून मोठ्या पदावर गेला पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना..-आ.लंके

नगर:
“माझ्या नावाने “निलेश लंके प्रतिष्ठान” आहे,पण मी त्याचा साधा सभासदही नाही, त्यांनी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षाने एक जाहिरात टाकली, पण मी ती अजून पाहिली नाही. त्यांना मी विचारणार आहे, बाबांनो ही काय भानगड आहे?? पण कार्यकर्त्यांची आपल्या नेत्या बद्दल एक भावना असते की आपला नेता अजून वरच्या पदावर गेला पाहिजे” अशी प्रतिक्रिया आ.निलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृत्तपत्रात आणि समाज माध्यमात प्रसिद्ध झालेल्या “अब दिल्ली दूर नही” या जाहिराती बाबत दिलीय.  आ.लंके यांचा रविवारी वाढदिवस होता. या निमित्ताने नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत गणेशाचे दर्शन करत आरती केली. यानंतर “न्यूजनगरी” वेब वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आ.निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके या लोकसभा निवडणुक लढवणार अशी जोरदार चर्चा आहे. लंके दांपत्याने नुकतेच घेतलेले दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध जाहीर कार्यक्रम पाहता ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरत असल्याचे एव्हाना स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी अजून पर्यंत आ.निलेश लंके यांनी स्वतः आपण लोकसभा निवडणुक लढवणार असे बोललेले नाही हे विशेष. या विषयावर पत्रकारांनी त्यांना अनेकदा छेडले असता, आपण एक सामान्य आणि छोटा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगत वरिष्ठ देतील तो आदेश मानणारा आपण कार्यकर्ता असल्याचे एव्हढेच उत्तर दिलेले आहे. मात्र एकूणच रविवारी आ.लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ पारनेर-नगर मतदारसंघच नव्हे तर जिल्ह्यातून आणि राज्यातून कार्यकर्ते आणि चाहत्यांनी आ.लंके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

नगर मध्ये श्री विशाल गणेशाची आरती

दिवसभर ते नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त असताना लंके यांनी परिसरातील विविध मंदिरांना भेटी देत दर्शन घेतले. तसेच अनेक ठिकाणी त्यांचे आगमन होताच ढोल,ताशा आणि तुतारी वाजवत आणि फटाके फोडत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सुप्यात त्यांच्या पुढे ढोल,ताशा आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मिळालेले तुतारी चिन्ह असलेली “तुतारी” वाजल्याने आ.लंके हातातील घड्याळ काढून हातात “तुतारी” घेणार या चर्चेला पृष्ठी मिळत आहे. वृत्तपत्रातून “दिल्ली अब दूर नही” ही टॅग लाईन असलेली आणि त्यावर शरद पवार, अजित पवार यांचे छायाचित्र असल्याने लंके काय निर्णय घेणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -
सुप्यात ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात स्वागत

नगर मध्ये श्री विशाल गणपतीचे त्यांनी दर्शन घेत आरती केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आणि भाजप जिल्हा शहर अध्यक्ष अभय आगरकर वगळता इतर अनेक ट्रस्टी उपस्थित होते. भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, पंडित,खरपुडे, अशोक कानडे, संजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.फटाक्यांच्या अतिषबाजीत आ.लंके यांचे आगमन झाले. ट्रस्टच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या, यावेळी त्यांच्या सोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

यावेळी “न्यूजनगरी” वेब वृत्तवाहिनीशी बोलताना आ.लंके यांनी आपण विशाल गणेशाला शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळू दे, दुष्काळ हटू दे,  नागरिकांना सुखी-समृद्ध जीवन लाभू दे, दिव्यांगांना सोयीसुविधा मिळू दे असे साकडे घातल्याचे सांगितले. आज दिवसभर माझ्या मतदारसंघासह जिल्ह्यातून आणि राज्यभरातून मला शुभेच्छा देण्यासाठी लोकं आली, हीच आपली खरी कमाई असल्याचे लंके यांनी भावनिक होत सांगितले. आयुष्यात पैसा, पदे याला मी कधी महत्व दिले नाही. जनतेची सेवा आणि त्यांच्या अडीअडचणीच्या काळात धावून जाणे  हेच आपले उद्दिष्ट राहिले आहे, त्यामुळे आपण कसलीही चिंता करत नाही असे ते म्हणाले.

- Advertisement -

विशाल मंदिरात आरतीच्या निमित्ताने ढोल-नगारे वाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.लंके यांना आता ढोल-ताशा बरोबर “तुतारी” पण वाजणार का? असा प्रश्न केला असता त्यांनी, मंदिरे म्हंटले की आरतीच्या वेळी विविध वाद्य ही वाजतच असतात असे सांगितले. तुतारी वाजणार का? असे त्यांना पुन्हा विचारले असता सगळे वाद्य वाजणारच असे सूचक उत्तर त्यांनी देत स्पष्टपणे बोलणे टाळले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा