Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
8.6 C
New York
Tuesday, October 20, 2026

जागतिक महिला दिनी श्रीगोंदयात काळिमा फासणारी घटना.. 9 वर्षाच्या बालिकेवर दोघांनी केला अत्याचार..

श्रीगोंदा (प्रतिनिधी दादा सोनवणे):
8 मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जगात सर्वत्र महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री सुरक्षा, सबलीकरण, समता, महिलांचे अधिकार, शिक्षण,उन्नती आणि समाजात बरोबरीचे स्थान या साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका उमलत्या कळीवर वारंवार अत्याचार होत असल्याचा प्रकार पुढे आला आणि यासंदर्भात gunha दाखल होत दोन नराधमांना अटक करण्यात आली. या घटनेने केवळ श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार जबरी संभोग केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्या नंतर मुलीच्या घरच्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला.

यानंतर मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो, ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा सर्व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत.

- Advertisement -

जागतिक महिलादिनी असा घृणास्पद प्रकार समोरआल्याने  तालुक्यात एकच खळबळ उडाली असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना पूढे आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा