नगर:
दि.17/02/2024 रोजी नगर शहरातील
1) द लव्ह बर्ड कॅफे(THE LOVE BIRDS CAFE)चा मालक ऋषिकेश सखाराम निर्मळ रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर
2) ऑर्गनो कॅफे (ORGENO CAFE)चे मालक अविनाश विलास ताठे रा. पंपिंग स्टेशन रोड सावेडी अहमदनगर
3)गोल्डन फेम कॅफे (GOLDAN FLAM CAFE)चे मालक सार्थक अनिल गंधे रा. बालिकाश्रम रोड गंदे मळा अहमदनगर (मालक) (फरार) व काम करणारा शिबान मुअंदे रा. बालिकाश्रम अहमदनगर हे शाळा व कॉलेजमधील मुला मुलींना बसण्याकरिता व अश्लील चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी छापा टाकून कारवाई करून वरील आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, सुयोग सुपेकर, संतोष ओव्हाळ, गणेश चव्हाण, सचिन जाधव, हेमंत खंडागळे सचिन मिरपगार व सागर द्वारके यांच्या पथकाने केली आहे.
शहर उपअधीक्षकांनी केली तोफखाना हद्दीत तीन कॅफेंवर धडक कारवाई, गुन्हे दाखल..अश्लील चाळ्यांसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट!!
- Advertisement -