Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

नगर दक्षिणेत नव्या 15 बंधाऱ्यांना मान्यता.. कोणत्या तालुक्यात किती केटी वेअर..

को.प. बंधारे व गे.सी. बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता..

खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

को.प. बंधारे व गे.सी. बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.  

या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

- Advertisement -

या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची; अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच जेव्हापासून महायुती सरकारने राज्याचा कारभार सांभाळला तेव्हापासून विविध विकासकामे ही वेगाने मार्गी लागत असल्याचे मत मांडले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा