Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
16.5 C
New York
Monday, June 16, 2025

साईंबाबांच्या झोळीत 16 कोटींच महादान

शिर्डी :  देशासह परदेशातही शिर्डीच्या साई बाबांचे (Shirdi Sai Baba) भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या आठवड्यात नाताळ आणि नव वर्षानिमित्त लागून सुट्या आल्या होत्या या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले. सहसा नवीन वर्षाच्या सुरूवातीला शिर्डीमध्ये गर्दी होत असते, मात्र यंदाची संख्या ही विक्रमी ठरली आहे. नाताळची सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्‍वागताला शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान दिले आहे. दहा दिवसात एकुण 16 कोटी रूपये साईबाबांच्या चरणी अर्पण केले आहे. यामुळे संस्थानाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

इतक्या भाविकांनी घेतले दर्शन

शिर्डीत 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तब्बल आठ लाख भाविकांनी साईदर्शन घेतले आहे. साईदर्शनाला आलेल्या भाविकांनी भरभरून दान दिले असून विविध माध्यमातून दहा दिवसात जवळपास 16 कोटी रूपये साईबाबा संस्थानाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नविन वर्षाचे स्वागत साईदर्शनाने करण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती आलेल्या या भक्तांना साईबाबांना भरभरून दान अर्पण केले आहे.

यापैकी दानपेटीत केलेल्या दानाची आकडेवारी  7 कोटी 80 लाख रूपये आहे. तर देणगी काऊंटर जमा झालेल्या दानाची रक्कम 3 कोटी 53 लाख रूपये इतकी आहे. ऑनलाईन देणगीतुन संस्थानाला तब्बल 4 कोटी 21 लाख रूपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय 32 लाख रूपयांचे सोने तर 7 लाख 67 हजार रूपये किमतीची चांदी अर्पण करण्यात आली आहे. विविध माध्यमातून एकुण 15 कोटी 96 लाख रूपयांचे भरभरून दान भक्तांनी दिले आहे. तर दुसरीकडे 6 लाख भाविकांनी मोफत भोजनप्रसाद घेतला. संस्थानाकडून 11 लाख लाडू पाकीटांची विक्री करण्यात आली तर 7 लाख 46 हजार भक्तांना मोफत बुंदी पाकीट प्रसादाच्या स्वरूपात देण्यात आले.   

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा