Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
13.8 C
New York
Friday, October 16, 2026

31 जानेवारीला आश्चर्यकारक निकाल लागेल!! निकाल अजित पवार गटाच्या विरोधात जाण्याची रोहित पवारांनी केली शक्यता व्यक्त..

अहमदनगर: शरद पवार यांच्या वया वरून अजित पवारांकडून वारंवार मुद्दा समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली असून भाजप सगळ्यांनाच ऑफर देते, त्यांच्याकडे  80 वर्ष वय झालेले  लोक खासदार झालेले आहेत. मात्र कुठेतरी अजितदादा मित्र मंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा पवार साहेबांबद्दल बोलतात त्याला पाठबळ देण्याचं भाजप काम करत असताना दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात आहेत कारण भाजप कडे मोठी आर्थिक शक्ती असून दबावतंत्र ते वापरत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

त्याचबरोबर पूर्वी काही नेत्यांचा रुबाब आपण पाहत होतो. मात्र काही नेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात चार मोठे नेते मागील सीटवर दाटीवाटीने  बसताना दिसत आहेत.  दिल्लीमध्ये या नेत्यांना चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळे कुठेतरी कुणाला सहा जागा कोणाला आठ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असे चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजप मध्ये हुकूमशाही तर आमच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मधे लोकशाही असल्याचा टोला रोहित पवार यांनी महायुतीतील नेत्यांना लगावला.

राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे, मात्र हा निकाल आश्चर्यजनक असणारा असून अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात असेल असे आम्हाला वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले. आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे तर  त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल आणि त्यामुळे 31 जानेवारीचा निर्णय हा आश्चर्यजनक असलेला आपल्याला दिसेल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महा जनता पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की काल एकंदरीत उद्धव ठाकरे  कमी बोलले मात्र दुसरीकडे शिवसेनेचे वकील आणि तज्ञ मंडळी यांनी एकूणच सर्व खटला सविस्तरपणे जनतेसमोर मांडला आहे. त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे फोटो काल दाखवण्यात आले ज्यात हेच सोडून गेलेले नेते पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसत आहेत.  त्यावर  लगेच विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यामुळे त्यांना कुठेतरी कुणाचा आदेश पाळावा लागतोय काय असं दिसून येत असल्याची टीका रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा