Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
18.5 C
New York
Saturday, June 14, 2025

वांबोरी चारीचे 25 लाखांचे थकीत लाईट बिल अखेर वर्ग.. खा.विखे-माजीमंत्री कर्डिलेंच्या प्रयत्नांना यश!!

राहुरी(प्रतिनिधी):

वांबोरी चारीतील 25 लाखांचे लाईट बिल थकीत होते. हे लाईट बिल खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळे एमएसईबीच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. वांबोरी चारीचे जर 3 पंप चालू असले तर सुमारे 01 कोटीच्या आसपास महिन्याचे लाईट बिल येत असते. त्यामुळे लाईट बिल थकल्याचे समोर आले. दरम्यान उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय 22 ऑगस्ट 2023 नुसार अतिउच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेंतर्गत ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याने वांबोरी चारीचे 02 महिन्याच्या लाईट बिलामध्ये एकूण 01,09,75,946 कोटी इतकी सबसिडी शासनाने दिलेली आहे. या सबसिडीमुळे नोव्हेंबर महिन्याचे करंट बिल 11,03,774.40 रुपये व डिसेंबर महिन्याचे करंट बिल 23,94,180 रुपये इतके कमी प्रमाणात आलेले आहे.

तसेच कार्यकारी संचालक, गोदावरी विकास महामंडळ यांच्या कार्यालयाकडे योग्य तो पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीचे चालू विद्युत देयक भरण्यासाठी 25 लक्ष इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे वांबोरी चारीचे महावितरणकडून तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्यात आले असून आता वांबोरी चारी पुन्हा चालू होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा