Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
19.5 C
New York
Tuesday, June 17, 2025

आ.आशुतोष काळेंची पतंगबाजी!! म्हणाले माझ्या पतंगाचा मांजा..

मतदासंघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहील- आ.आशुतोष काळे
कार्यकर्त्यां समवेत आ.आशुतोष काळेंनी घेतला पतंगबाजीचा आनंद..

कोपरगाव(प्रतिनिधी):
ज्या विश्वासाने मतदार संघाच्या विकासाची दोर मतदार संघातील जनतेने माझ्या हातात सोपविली त्या विश्वासाला पात्र राहून मतदार संघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

आ.आशुतोष काळे यांनी मकर संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आपल्या प्रत्येक सणाच्या मागे संस्कृती आहे. प्रत्येक सणाचे निसर्गाशी नाते असून निसर्गच  आपल्याला या सणांच्या निमित्ताने एकत्र आणतो त्यामुळे आजही हे सण आणि उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. अशाच महत्वपूर्ण सणांपैकी एक सण असलेला मकर संक्रांतीचा सण.

- Advertisement -

या सणाला लहानपणी मित्रांसोबत अनेक वेळा पतंग उडवण्याचा आनंद घेतला. परंतु प्रत्येकाचे वय वाढले की जबाबदाऱ्या देखील वाढत असतात.त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतांना आपण आपले छंद,खेळ यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी  कार्यकर्त्यांना समवेत पतंग उडवतांना मनाला वेगळाच आनंद मिळाला. वय आणि जबाबदाऱ्या जरी वाढल्या तरी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून प्रत्येकानेच असा खेळाचा आनंद दरवर्षी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

यानिमित्ताने माझ्या प्रयत्नांचा मांजा एकदम पक्का आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाची दोर माझ्या हाती सुरक्षित राहणार आहे  आणि कोपरगावच्या विकासाचा पतंगही असाच सातत्याने आकाशात उंच भरारी घेत राहील.येणाऱ्या काळात हा विकासाचा पतंग अजून उंचावर नेऊन कोपरगाव मतदार संघाचा कायापालट होणार असल्याची आ.आशुतोष काळे यांनी ठामपणे ग्वाही देवून कार्यकर्त्यांसह मतदार संघातील नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा