Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
27.9 C
New York
Thursday, June 12, 2025

विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव!! महाविकास आघाडीचा आरोप..

नीलेश साहेबराव लंके यांचा डमी अर्ज दाखल!! पत्रकार परिषदेत आरोप..

नगर:
विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा  निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
     
राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, आपचे संघटक सुभाष केकाण हे उपस्थित होते.
     
महाविकास आघाडीच्या वतीने बोलताना राजेंंद्र फाळके यांनी सांगितले की, विखे हे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबात त्यांच्या सख्ख्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. रक्ताच्या नात्यातील असल्याचे भासविण्यासाठी दुसरी व्यक्ती उभी करून संपत्तीची विल्हेवाट लावल्याचा आरोपही अशोक विखे यांनी केला असल्याचे फाळके यांनी सांगितले.

तलाठी भरतीमध्येही डमी उमेदवार पास !

- Advertisement -

महसूल विभागाच्या तलाठी भरतीमध्येही अनेक डमी उमेदवार पास झाले. अशाच प्रकारे डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटूंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे नावातील साधर्म्य पाहून दिशाभुल करण्यासाठी डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप फाळके यांनी केला.

कोणती यंंत्रणा पळाली ?

- Advertisement -

फाळके म्हणाले, निघोजच्या जानेवारी महिन्यात प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक  १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव  आहे. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या सुधारीत मतदार यादीत भाग क्र.  ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर नीलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. नीलेश साहेबराव लंके यांचे नाव निघोजच्या मतदार यादीत टाकण्यासाठी अशी कोणतील शासकीय यंत्रणा पळाली असा सवाल फाळके यांनी केला.

एकाच व्यक्तीने आणले दोघांचेही स्टॅम्प नोटरीचा वकीलही एकच

निवडणूक अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ज्या डी.पी. अकोलकर यांनी स्टॅम्प खरेदी केला, त्याच अकोलकर यांनी नीलेश साहेबराव लंके यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प खरेदी केला आहे. तर एकाच वकीलाने दोघांचीही नोटरी केल्याचा दावाही फाळके यांनी कागदपत्रांसह केला.



विखे कुटूंब घाबरले !
 
निवडणूक प्रक्रियेदरम्यान बातम्या चालवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विखेंकडून होईल अशी शंका व्यक्त करतानाच गांधी मैदानावर झालेल्या सभेत शरद पवार यांनी नगरचा उमेदवार बदलण्यासाठी उद्योगपतीला पाठविल्या गंभीर आरोप केला होता. त्यामुळे विखेे कुटूंब महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबलेले दिसते असे फाळके म्हणाले.

डमी राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही

लंके यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यताही फाळके यांनी व्यक्त करतानाच ते नीलेश ज्ञानदेव  लंके यांच्या उमेदवारीला घाबरले असतील तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना, पक्षाला तसे कळवायला हवे होते. डमी राजकारण होणार असेल तर जिल्हा ते खपवून घेणार नाही असे फाळके म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा