Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
2.9 C
New York
Monday, October 19, 2026

मी माझा डाव उधळला आहे, लोकसभा जिंकूनच हा डाव सावरायचा आहे-निलेश लंके

नगर:

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन 2019 बसवला डाव उधळला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकून उधळलेला डाव सावरण्याची जबाबदारी पारनेरसह नगर दक्षिणेतील माझ्या समर्थकांची आहे. जीवाचे रान करा, मतदारांपर्यंत पोहचा, विरोधी कार्यकर्त्यांना आपलेसे करून विश्वास निर्माण करा. काहीही झाले तरी आपल्याला जिंकायचे आहे असे भावनिक आवाहन महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांनी केले आहे.

निलेश लंके यांची सध्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून यात्रेच्या शेवटच्या टप्यात सोमवारी सुपा गावात झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात निलेश लंके यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना काहीसे भावनिक होत प्रचारास आता खरी सुरुवात होणार असून गाफील राहू नका, बूथ कमिट्यांवर काम करा, तुतारी चिन्ह घराघरात पोहचवा, विरोधात काम करणाऱ्यांना पटवून देत आपलेसे करा, एकट्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातुन एक लाखावर लीड मिळाले पाहिजे या दृष्टीने कामाला लागा अशा सूचना केल्या. यावेळी जेष्ठनेते दादाभाऊ कळमकर, शशिकांत गाडे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते. जनसंवाद यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर शहरात 19 एप्रिल रोजी होणार असून यानिमित्ताने होणाऱ्या सभेत मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा