Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
2.9 C
New York
Monday, October 19, 2026

घड्याळ तेच वेळ नवी!!नागवडे दांपत्याने केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश..

नगर:
श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक दशके राजकारणात वर्चस्व असलेले नागवडे परिवारातील राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. पुण्यामधील बालेवाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले नागवडे दांपत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचं स्वागत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी  गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाचा पंचा टाकत आणि पुष्पगुच्छ देत केले.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र नागवडे आणि जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे दाम्पत्य काँग्रेस पक्षावर काहीसे नाराज होते. गेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आणि समर्थ कार्यकर्त्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह झाल्यानंतर नागवडे दाम्पत्यांने कोणताही परिस्थितीमध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला होता. दरम्यान गेल्याच महिन्यामध्ये दिवंगत शिवाजीबापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी ही सूचक मानली जात होती. त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेकदा मुंबईमध्ये नागवडे दाम्पत्यांने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा प्रवेश हा निश्चित झालेला होता. दरम्यान जयंती सोहळ्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देत लवकरच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे घोषित केले होते. त्याच आज रविवारी पुण्यामध्ये बालेवाडी मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यामध्ये राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी पक्षप्रवेश केला आहे. नागवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे  श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून लोकसभेनंतर होणारी विधानसभा निवडणुकी लक्षवेधी अशीच असणार आहे. सध्या ह्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार बबनराव पाचपुते विद्यमान आमदार असताना त्याचबरोबर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप पूर्ण तयारीत असताना आता नागवडे दाम्पत्याने राष्ट्रवादी पक्षातून आपल्या उमेदवारीची दावेदारी दाखल केलेली आहे. त्यामुळेच श्रीगोंदाचे राजकारण आता मोठे लक्षवेधी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

पक्षप्रवेशानंतर न्यूजनगरीच्या वतीने अनुराधा नागवडे यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी आज पक्षप्रमुख अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या दोघांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला असल्याचे सांगत यापुढे येणाऱ्या काळात अजित पवार जो आदेश देतील त्या पद्धतीने काम केले जाईल असे सांगितले. पक्ष प्रवेशानंतर पदा बाबत त्यांना विचारले असता आज फक्त पक्षप्रवेश दिला असून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस साठी काम करणार असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा