अजित पवारांच्या राष्ट्रवादीत या तारखेला प्रवेश !!
श्रीगोंदयातुन अनुराधा नागवडे विधानसभा लढवणारच -राजेंद्र नागवडेंचा निर्धार
नगर:
राजकारणात गॉडफादर पाहिजे..
अजित पवार यांनी पाठबळ देण्याचा शब्द दिला आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आज श्रीगोंद्यात आयोजित एका समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. गेली अनेक काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील जिल्हाध्यक्ष पदावर असलेले राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे या विधानसभा निवडणूक लढवणारच या मुद्द्यावर ठाम होत्या. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी त्यांना अपेक्षित होती. मात्र एकूणच महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे कडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. त्यांनी काहीही झाले तरी, वेळ आली तर अपक्ष किंवा इतर पर्याय निवडू मात्र विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान श्रीगोंदा येथील विधानसभा निवडणूक राजेंद्र नागवडे यांच्या ऐवजी अनुराधा नागवडे लढवणार असे पुढे येत होते..दरम्यान नुकतेच दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी नागवडे परिवाराच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली होती. यावरूनच नागवडे दांपत्य लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करेल असे बोलले जात होते. दरम्यान आज श्रीगोंदा मध्ये नागवडे समर्थकांच्या झालेल्या मेळाव्यात राजेंद्र नागवडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना येणारी विधानसभा निवडणूक अनुराधा नागवडे या लढवणार आहेत. जो ही पर्याय उपलब्ध असेल तो मात्र निवडणूक लढवणारच असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्याचबरोबर अजित पवार यांनी आम्हाला पाठबळ देण्याचे स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणाही राजेंद्र नागवडे यांनी मेळाव्याच्या निमित्ताने केली आहे. एकूणच नागवडे दांपत्याने घेतलेल्या भूमिकेमुळे आज एकीकडे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा होत असतानाच थोरात यांनी नेहमीच पाठबळ दिलेले नागवडे दाम्पत्य मात्र आज काँग्रेस पक्षाला टाटा बाय-बाय करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्षाचा असलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर तातडीने काँग्रेस पक्षाकडून प प्रभारी जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आल्याचे समजत आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
नागवडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास यावेळी बाळासाहेब नाहटा, बाबासाहेब भोस, राकेश पाचपुते, सुभाष शिंदे, रामदास झेंडे, मच्छिंद्र सुपेकर, शिवाजीराव पाचपुते, सतिष मखरे यांच्यासह नागवडे कारखान्याच्या संचालकांची उपस्थिती होती.
राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी महत्वाची भूमिका घेत नागवडे दांपत्याची भेट घडवून आणली. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा अनुराधा नागवडे आणि माझा दोघांचाही आज राजीनामा पाठविला असल्याचे जाहीर करत येत्या २० तारखेच्या आत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा राजेंद्र नागवडे यांनी केली.