Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

श्री विशाल गणेश मंदिर स्वच्छता मोहिमेत राम शिंदेंसह शहर भाजप पदाधिकारी सहभागी..

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरासह परिसरात स्वच्छता मोहिम

श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे – आ.राम शिंदे

नगर(प्रतिनिधी):

- Advertisement -

आयोध्या येथे निर्माण झालेल्या श्रीराम मंदिरात दि.22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या अभुतपुर्व सोहळ्याची जय्यत तयारी देशभर सुरु असून, देशातील गाव-शहरातील सर्वच मंदिरांची स्वच्छता करण्यात येऊन दि.22 रोजी मंदिराज सामुदायिक आरती करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री विशाल गणेश मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. या सोहळ्यात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. आयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, ही सर्वांची भावना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्यक्षात श्रीराम मंदिर पूर्ण होऊन रामल्लाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात प्रत्येकाचा सहभाग असावा यासाठी आपआपल्या भागातील मंदिराची स्वच्छता करुन त्या दिवशी मंदिरात आरती, विद्युत रोषणाई, दिपोत्सव आदिंबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन या अभुतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी केले.

नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या संकल्पनेतून शहराचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर परिसरात माजी मंत्री आ.राम शिंदे व शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी, प्रशांत मुथा, सुनिल रामदासी, गोकूळ काळे, चंद्रकांत दारुणकर, राजू एकाडे, अनिल सबलोक, बाबासाहेब सानप, प्रविण ढोणे, राहुल जामगावकर, बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, सुहास पाथरकर, प्रशांत जोशी, गोपाल वर्मा, मंगेश खंगले, विशाल खैरे, निशांत दातीर, मालनताई ढोणे, लता शेळके, रविंद्र बारस्कर, प्रविण ढोणे, पंडित वाघमारे, ऋषीकेश आगरकर, शशिकांत पालवे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत फंड, शरद बारस्कर, संदिप पवार, अनिल वाकचौरे, सहदेव चव्हाण, मिराताई सरोदे, महेश हेडा, सुनिल तावरे, अक्षय गांधी, भरत चुडिवाल, कैलास गर्जे, निलेश सातपुते, महेश गुगळे, छायाताई रजपुत, लिलाताई आगरवाल, संदिप ढाकणे, विशाल मरकड, भुषण ढापसे, दिपक मगर, अमोल लवांडे, अविनाश कांबळे, विशाल कर्डिले, नंदाताई शेळके, गणेश नन्नवरे, मिनीनाथ मैड, अनिल गट्टाणी, रेणुका करंदीकर, आबा सातपुते, विजय गायकवाड, पंडित खैरे, अजित कोतकर, वैशाली उदावंत, सागर आरडे, दिपक देहेरेकर, राज शेलार, विकास घोरपडे, सौरभ आजबे, हर्षल जोशी, अनंत देसाई, रविंद्र बारस्कर, स्वानंद पिंपुटकर, राजू मंगलारप, डॉ.दरेकर, अनिल ढवण, विजय घासे, कुंडलिक गदादे, विलास नंदी, बाळासाहेब खताडे, सतीश रासने, मयुर बोचुघोळ, जितू ढापसे, सतीश शिंदे, किशोर वाकळे, उमेश साठे, सोमनाथ चिंतामणी, सविता कोटा, प्रिया कुलकर्णी, अक्षय ढाकणे, सुजय मोहिते आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, आयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, हा सोहळा नेत्रदिपक करण्यासाठी सर्व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाशिक येथील काळाराम मंदिरात येऊन स्वत: स्वच्छता केली. आपणही आपल्या परिसरातील मंदिरांची स्वच्छता करण्यात येऊन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

यावेळी आ.राम शिंदे यांनी श्री विशाल गणेश मंदिर, संत सावता महाराज मंदिर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता केली. या मोहिमेमध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा वॉरियर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(छायाचित्र सौजन्य: राजू खरपुडे)

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा