Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

विद्यार्थ्यांच्या रास्तारोकोत “सहभागी” होत पालकमंत्र्यांनी काढला असा मार्ग!!

नगर(प्रतिनिधी):
महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेवून देहरे येथे महामंडळाच्या बस गाड्या थांबविण्यासाठी परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली.मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून  उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला.

देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या समस्येच गांभार्य लक्षात घेवून विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लाॅन्समध्ये येण्यास सांगितले.युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली.विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थाबतील आशा पध्दतीची कार्यवाही उद्या पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा