खासदार निलेश लंकेचा रात्रीचा मुक्काम माजी आमदार कै. अनिलभैया राठोड यांच्या ओमिनी गाडीत
नगर:
आंदोलन स्थळी मंडपात जागा नसल्याने खासदार लंके यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आपला मुक्काम कै. आमदार अनिलभैया राठोड यांच्या ओमिनी कार मधे आंदोलन स्थळी केला अनिल भैया हयात असताना याच ओमिनी कार मधून प्रवास करायचे, खासदार लंके यांच्यासमवेत या कार मधे अनिलभैय्यांचे सुपुत्र विक्रम राठोड देखील या कार मधे मुक्कामी राहिले.
जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून उपोषण आंदोलन करणारे खासदार लंके यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यातील गावागावातील नागरिक या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी तसेच खासदार लंके यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असलेल्या आंदोलनस्थळी येत खासदार लंके यांच्याशी संवाद साधत आहेत
तसेच केवळ नगर दक्षिण च नव्हे तर नगर उत्तरेतीलही अनेक पीडित नागरिक पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराच्या अनेक तक्रारी लंके यांच्यासमोर आंदोलन स्थळी येऊन मांडत आहेत आंदोलन स्थळी दिवसा आणि रात्रीही मोठी गर्दी दिसून येत असून दोन दिवस उपोषण केल्याने खासदार लंके यांची तब्येत आता काहीशी खालवली आहे या परिस्थितीत उपोषण स्थळी उभारलेल्या मांडवामध्ये अनेक कार्यकर्ते स्वयंस्कृतिने 24 तास थांबत खासदार लंकेच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत आहे
रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी या ठिकाणी जागाही उपलब्ध होत नाही नेहमीच कार्यकर्त्यांची काळजी घेणारे खासदार लंके यामुळे नगर शहराचे 25 वर्ष आमदार राहिलेले माजी मंत्री आणि मोबाईल आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले स्व.अनिल भैय्या यांच्या मारुती ओमिनी या गाडीमध्ये त्यांनी काल रात्रीची विश्रांती घेतली सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत वातावरण थंडगार आहे आणि यामध्ये उपोषण आंदोलन करत असताना एक कट्टर शिवसैनिक असलेले खासदार लंके यांनी अनिल भैय्या राठोड यांच्या ओमिनी मारुती गाडीमध्ये काल रात्री विश्रांती घेतली यावेळी त्यांच्यासोबत अनिल भैय्यांचे पुत्र विक्रम राठोड हेही सोबत होते
या दोघांनीही रात्रीचा मुक्काम अनिल भैय्यांच्या ओमिनी कार मध्ये केला नगर शहर अनिल भैय्या आणि अनिल भैय्यांची मारुती ओमिनी कार ही अवघ्या नगर शहराला परिचित आहे निलेश लंके हे पूर्वाश्रेणीचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना पक्षा मधूनच सुरू झाला आणि या माध्यमातूनच त्यांनी आपल्या कामातून आपली छाप पारनेर तालुक्यात उमटवली आणि त्यामुळेच कुठेतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते असले तरीही त्यांची नाळ दिवंगत अनिल भैय्या यांच्याशी नेहमीच राहिलेली आहे खासदार लंके यांच्या हातामध्ये नेहमीच शिवबंधन असते आणि त्यामुळेच ते आजही एक शिवसैनिकाच्या भूमिकेत आक्रमकपणे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत असतात
आज संसदेमध्ये खासदार या पदावर असतानाही खासदार लंके नगर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर एका मांडवामध्ये दोन दिवसापासून उपोषण आंदोलन करत आहेत पोलीस खात्यामधील अनागोंदी कारभार हा सर्वसामान्य नागरिकांना खूपच त्रासदायक होत असताना त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी भूमिका घेतलेली आहे या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातून त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे विशेष करून जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी येत त्यांना पाठिंबा देत आहे विक्रम राठोड यांनी शिवसेनेची धुरा नगर शहरात ताकतीने कायम ठेवलेली आहे खासदार लंके यांच्या आंदोलनात त्यांचा आणि शिवसेनेचा मोठा सहभाग दिसून येत आहे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी संभाजी कदम बाळासाहेब बोराटे आदी नेते आंदोलन स्थळी तळ ठोकून आहेत आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहता त्यांना रात्रीचा मुक्काम मांडवामध्ये व्यवस्थित व्हावा यामुळे विक्रम राठोड यांनी स्वर्गीय अनिल भैय्या राठोड हे वापरत असलेली मारुती ओमिनी या कारमध्ये त्यांना रात्रीचा आराम करण्याची विनंती केली आणि खासदार लंके यांनीही मान्य करत काल रात्रीचा मुक्काम विक्रम राठोड यांच्यासह ओमिनी मारुती कार मध्ये केला
याबाबत विक्रम राठोड यांनी सांगितले आहे की खासदार निलेश लंके हे नेहमीच अनिल भैयांचे चाहते राहिले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काल रात्रीचा मुक्काम अनिल भैय्या वापरत असलेले असलेल्या ओमिनी मारुती गाडीमध्ये मुक्काम केला. एक सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून शिवसेनेने नेहमीच एक भूमिका घेतलेली आहे नगर शहरांमध्ये शिवसेनेचे मोठे प्राबलले आहे
मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये नगर शहरांमध्ये राष्ट्रवादीने आपला धबधबा आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उभा केलेला आहे त्यामुळेच उंबरठ्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत नगर शहराचा गड पुन्हा एकदा शिवसेना आपल्या ताब्यात घेणार की आमदार संग्राम जगताप आपली सत्ता सलग तिसऱ्यांदा कायम ठेवणार याची मोठी उत्सुकता नगर शहरात आहे मात्र खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेले विविध विषयांवरील आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी असल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे आणि याचा प्रत्यय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असा कयास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.