Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
5.7 C
New York
Sunday, October 18, 2026

एलसीबीचे पो.नि.दिनेश आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करा.. डॉ.मकासरेंची मागणी

राहुरीचे डॉ.मकासरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर:
अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मकासरे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले की, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे विरोधात अनेक राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी हप्ते घेण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री,पो लीस महासंचालक,पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक या सर्वांकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या बद्दल तक्रारी केल्या असून याबाबत अनेक वृत्तपत्रातही बातम्या छापून आलेल्या आहेत. त्या तक्रारींचा विचार करून सदर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची अहमदनगर येथे नेमणूक झाल्यापासून त्यांनी खरेदी केलेल्या त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेतलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी व्हावी. तसेच ते वापरत असलेल्या मोबाईलचे कॉल, एसएमएस, व्हाट्सऍप कॉल व व्हाट्सऍप मेसेजेसची अहमदनगर येथील नेमणूकी पासून ते आजपर्यंतची सविस्तर माहिती घेवून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मकासरे यांनी केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा