Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

वरुण राजाच्या साक्षीने सांगता सभेत विखे झाले आक्रमक!! भावना केल्या मोकळ्या..

गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही!

श्रीगोंदा:
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही! मागील ४५ दिवसात त्यांनी कुणावरही टिका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्या मार्फत केलेल्या कामांच्या जोरावर मते मागीतली. पण सांगता सभेत त्यांनी घेतलेली आक्रमता ही कार्यकर्त्यांना नवी उर्जा देणारी ठरली.
शनिवारी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंद्यातील शनी चौकात सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संबोधित करणार होते. सभेला हजारो लोकांची गर्दी जमली असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने ही सभा आटोपती घ्यावी लागली, असे असतानाही डॉ.सुजय विखे यांनी भर पावसात लोकांशी संवाद साधला. 
डॉ.विखे पाटील यांनी मागील ४५ दिवस भर उन्हात निष्ठेने प्रचार केला म्हणून सर्वांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी विरोधी उमेदवारांनी मागील ४५ दिवसात केलेल्या खोटारड्या प्रचाराचा समाचार घेतला. लोकांना शिव्या देणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिसांचा बाप काढणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, समाज माध्यमांवरून खोटेनाटे व्हिडीओ टाकून अफवा पसरविणे अशा सगळ्याच गोष्टीवर डॉ.सुजय विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी लोकांना आश्वस्त केले की, येणाऱ्या काळात अशा सर्व समाज विघातक प्रवृत्तींना चांगला धडा शिकवला जाईल.
ते म्‍हणाले की, ०४ जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास हेच आपले एकमेव ध्येय राहणार आहे. नगर मधील विविध प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करायची आहे. माझ्याकडे अद्वितीय अहिल्यानगरचे व्हिजन असून तुम्हाला गर्व वाटेल असा विकास मी करणार असल्याचे त्यांनी सांगितेले यामुळे मतदान करताना देशाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहून मतदान करा असा संदेश त्यांनी दिला.
कुणीही घाबरायचे कारण नाही, कारण महायुती सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जर कुणी दमदाटी, गुंडशाही, दडपशाही करत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे ते शेवटी म्‍हणाले. डॉ.सुजय विखेंच्या जोरदार भाषणाने भर पावसात कार्यकर्त्‍यांचा उत्साह वाढला. अवघे मैदान जय श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुजय विखे यांच्‍या घोषणेने दुमदुमून निघाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा