Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
3.5 C
New York
Monday, October 19, 2026

एमआयएम’ची एन्ट्री मविआ’च्या निलेश लंकेंची गणिते बिघडवणार!!

नगर:
अहिल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरवारी नवा भिडू दाखल झाला आहे. एमआयएम तर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्याने अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेऊन असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जातेय. डॉ. अशरफीच्या रुपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएम ने उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले. पण तोवर वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोवर संपुर्ण मतदार संघ पादाक्रिंत करत मतदारांच्या गाठी भेटी वाढवत आपले वातावरण तयार केले आहे.

दरम्यान यामुळे महाविकास आघाडीने मतदार संघातील अल्पसंख्याक समाजावर आपले लक्ष केंद्रीत करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला होता. पण आता खुद्द एमआयएम ने आपला गडी रिगंणात दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेची लाट पसरली आहे.

- Advertisement -

राज्यातील मविआ कडून एकही अल्पसंख्याक उमेदवार नाही!!
-एम आय एम ने दिलेले उमेदवार डॉ. परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी  आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण दक्षिण  लोकसभा मतदार संघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा