Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

जिरवाजिरवीच्या राजकारणात विखे पटाईत!नीलेश लंकेंचा खा.डॉ.विखेंवर हल्लाबोल..

जामखेड तालुक्यात स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा झंजावात..

जामखेड:(प्रतिनिधी नासिर पठाण):
खासदार म्हणून विकास कामे करण्याऐवजी खा. डॉ. सुजय विखे हे जिरवाजिरवीच्या राजकारणात पटाईत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला.
    
नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेस जामखेड तालुक्यातील खर्डा येथून प्रारंभ होऊन जामखेड शहरात समारोप झाला. विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते.
    
लंके म्हणाले, विकास कामे सोडून खा. विखे हे दाळ,साखर वाटत होते. खासदारकीच्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्यावर निवडणूकीला समोरे जाणे त्यांच्याकडून अपेक्षीत आहे. त्यांनी जिल्हयात किती उद्योग आणले ? किती तरूणांच्या हाताला काम दिले ? हे सांगून मते मागावीत. इंग्लिश भाषा येते का म्हणून मला हिणवण्यात काय हाशिल आहे असा सवाल लंके यांनी केला. 
     
लंके म्हणाले, मी खासदार होणारच आहे. खासदार झाल्यानंतर विजयाची पहिली सभा जामखेड येथे घेणार असल्याचे सांगत जामखेडला रेल्वे आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. मला लोक नोट देतात आणि व्होटही देतात असे सांगत जनसंवाद यात्रेदरम्यान शेकडो नागरीकांना आपल्या निवडणूकीसाठी मदत केल्याचे लंके म्हणाले. तुम्हाला  काम करणारा खासदार हवा की इंग्रजी बोलणारा हवा असे सांगत त्यांनी खा. विखे यांना टोला लगावला. 
     
यावेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, इंग्रजी येत नाही हा प्रचाराचा विषयच होऊ शकत नाही. विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत. कांदा प्रश्‍न लोकसभेत मांडला पाहिजे होता. मात्र कांदा प्रश्‍नावर आवाज न उठविता शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडून देण्यात आले.महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. कांदा, दुधाचे भाव पडले असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
     
यावेळी दत्तात्रेय वारे, मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, सुर्यकांत मोरे, संजय वराट, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, वसीम सययद, राहुल बेदमुथा, सुरेश पवार, संदीप गायकवाड, हनुमंत पाटील, सुरेश भोसले, वैजनाथ पोले, कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रा. विकी घायतडक, अभय शिंगवी, प्रकाश सदाफुले, रमेश आजबे, सचिन शिंदे, प्रविण उगले, बाबासाहेब उगले, युवराज उगले, बाबासाहेब मगर, भानुदास बोराटे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, भिमरााव लेंडे पाटील, बप्पा बाळेे, हरिभाउ बेलकर,नय्यूम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

लंके यांच्या निवडणूकीसाठी मदत
-नायगांव येथील माजी सरपंच, वयोवृृध्द शेतकरी व शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते  बाबासाहेब उगले यांनी लंके यांना निवडणूकीच्या खर्चासाठी दहा हजार रूपये दिले. आनंदवाडीचे युवा शेतकरी प्रकाश गीते यांनी ११ हजार, बाभुळगांव खालसाचे पोलीस पाटील अशोक पुराणे यांनी ५ हजार, नंदू उगले, युवराज उगले, महादेव उगले, प्रशांत वारे, शिवाजी ससाणे, रावसाहेब जाधव या युवा शेतकऱ्यांनी यात्रेदरम्यान ५० हजारांची मदत लंके यांच्याकडे सुपूर्द केली. कोंभळी येथील कॉर्नर सभेत रूपचंद्र गांगुर्डे यांनी लंके यांनी ५ हजार १०० रुपये मदत दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा