Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
3.5 C
New York
Monday, October 19, 2026

आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज म्हणाले, विजयी भव..विजयाची दिली निश्चिती!!

आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांनी दिली सुजय विखे पाटलांना विजयाची निश्चिती

नगर:
नगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जैन समाजाचे गुरू संत श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी महायुतील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजय निश्चितीचे आशिर्वाद दिले. यामुळे जैन समाजाचे पाठबळ विखे पाटील यांना लाभले असून त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य नगर शहरात साजरा केल्या जाणाऱ्या महोत्सवाच्या निमित्याने सुजय विखे पाटील यांनी कुंदनऋषीजी महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले होते. यावेळी कुंदनऋषीजी महाराज यांनी त्यांना आशिर्वाद देताना तुमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

नगर जिल्ह्यात राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्टेशन रोड ते आनंदधाम आश्रम पर्यंत शांती मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्च मध्ये सुजय विखे पाटील यांनी सहभाग आपला नोंदविला. त्यानंतर त्यांनी आनंदधाम येथे कुंदनऋषीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबीराला भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. आनंदधाम येथे येणाऱ्या भाविकांना शरबत वाटून सेवाकार्यात भाग घेतला. जैन समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील यांचा सत्कार करत त्यांना आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांचे तैलचित्र भेट देऊन येणाऱ्या निवडणुकीत जैन समाज आपल्या बरोबर असल्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी आमदार संग्राम जगाताप याच्यासह जैन समाजाचे प्रतिनिधी, हस्तीमल मनोद, अभय आगरकर, नितीन कुणकोळ वसंत लोढा, प्रेमजी बोथरा, संतोष बोरा, बाबूसेठ कवरा, निखील लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा